Mon, Nov 19, 2018 21:03होमपेज › Jalna › ‘भाजप सापनाथ तर राष्ट्रवादी नागनाथ’

‘भाजप सापनाथ तर राष्ट्रवादी नागनाथ’

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 09 2018 2:02AMजालना ः प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात भाजप सापनाथ तर राष्ट्रवादी नागनाथची भूमिका बजावत  असल्याची टीका आम आदमीचे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केली. 

सावंत म्हणाले की, राज्याचे भाजपसह सर्वच पक्षांनी वाटोळे केले असून त्या पक्षांना अरबी समुद्रात नेऊन बुडवले पाहिजे. भाजप सरकार आज देशात सर्वच क्षेत्रांत खासगीकरण आणू पाहत आहे. राफेल विमान कंपनीच्या सौद्यातही अनिल अंबानी यांना फ्रेंच कंपनीचे पार्टनर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात एस.टी.च्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे.  रेल्वेच्याही खासगीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. डिफेन्ससाठी पुरवण्यात येणार्‍या वस्तूही खासगीकरणातून घेतल्या जात आहे. देशात रिलायन्सला प्रत्येक क्षेत्रात झुकते माप दिले जात आहे.

आगामी निवडणुकीत आम आदमी पक्ष लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. त्यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवविणारे राज्यकर्ते आज हिंदू शेतकरी व सैनिकांच्याच मुळावर उठले. भाजपचे काम डिव्हाइड अ‍ॅण्ड रुल या म्हणीप्रमाणे सुरू आहे. पाकिस्तानात अमेरिकेनेच दहशतवाद निर्माण केला आहे. आम आदमीने जसे दिल्‍लीत परिवर्तन घडविले तसे परिवर्तन महाराष्ट्रात घडविण्यात येणार आहे.