Mon, Jul 06, 2020 11:52होमपेज › Jalna › जालना : नुकसान ग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांकडून बैलगाडीतून पाहणी

जालना : नुकसान ग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांकडून बैलगाडीतून पाहणी

Last Updated: Nov 11 2019 1:32AM

उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल आणि तहसीलदार मनीषा मेने यांनी बैलगाडीतून पाहाणी करतानावडीगोद्री (जि. जालना) : प्रतिनिधी

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल आणि तहसिलदार मनीषा मेने यांनी डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव शिवारात बैलगाडीत बसून शेतात जाऊन नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार पिक पाहणीसाठी येणार असल्याने झोपेत असलेले तलाठीही जागे झाले आहेत. अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनीही गावातील आपापल्या शेतीचे झालेल्या पिकांचे नुकसान अधिकाऱ्यांना दाखवले. या नुकसानीत कर आलेले सोयाबीन, पाण्यातील कपाशी, बाजरी, मका, मोसंबी यांचे अतिशय नुकसान झाले. या ठिकाणी सकाळपासून महसूल पथकासह पाहणी सुरू आहे.

अंबड तालुक्यातील डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव, पाथरवाला बुद्रुक, गोंदी, पाथरवाला खुर्द, वडीगोद्री आदी ठिकाणी पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि अनेक शेतकरी होते.

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने हिरावून घेतला यांची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. यंदा शेतकरी पाऊस न पडल्याने किंवा पाऊस जास्त पडल्याने दोन्ही वेळेस शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निसर्गाने यंदा साथ दिली नाही. यामुळे प्रशासनाने मदत करावी ही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.