Fri, Jul 19, 2019 07:46होमपेज › Jalna › विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत 

विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत 

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMजालना : प्रतिनिधी

समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी, आर्थिक तरतुदीअभावी अडकली आहे. जवळपास 20 हजार 897 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़  शैक्षर्णिक वर्ष संपले असून अजूनपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने, शेतकरी कर्जाप्रमाणे विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे. 

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत महाडीबीटी (महाराष्ट्र - डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) या पोर्टलचे उद्घाटन केले. आता सरकार ऑनलाइन सुपरफास्ट चालणार असा दिखावाही केला, मात्र या पोर्टलचे उद्घाटन करताना त्याची तपासणी केली नाही. त्यामुळे सरकारच्या या ऑनलाइन सुपर फास्टला आयटी विभागाला लाल सिग्नल लागला आहे. या सवार्र्ंचा फटका शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेणार्‍या विद्याथ्यार्र्ंना बसला आहे. 2017-18 है शैक्षर्णिक वर्ष संपले असून, अजूनपर्यंत विद्याथ्यार्र्ंना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. 

केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़  जालना जिल्ह्यात 2016 - 17 या शैक्षणिक वर्षात 31 हजार 233 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील सर्वच विद्याथ्यार्र्ंना यावर्षी शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली़  शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी महाडीबीटी पोर्टलमुळे सुरुवातीपासून शिष्यवृत्तीमध्ये गोंधळ निर्माण निर्माण झाला. या पोर्टलवर अगोदर ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आले. त्यातील तांत्रिक अडचणींमुळे  फॉर्म भरण्यास अडचणी येत बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर पुन्हा महाविद्यालयात  नवीन विद्याथ्यार्र्ंना ऑफलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जुन्या पोर्टलवर फॉर्म भरण्याचे सुविधा करण्यात आली. 

Tags : Jalna, Students, waiting,  scholarships