Wed, Feb 20, 2019 09:06होमपेज › Jalna › शिक्षकांच्या रिक्‍तपदांमुळे गैरसोय !

शिक्षकांच्या रिक्‍तपदांमुळे गैरसोय !

Published On: Mar 08 2018 12:39AM | Last Updated: Mar 08 2018 12:26AMअंबडः प्रतिनिधी

शासनाने कोट्यवधी रुपये  खर्च करून इमारत उभारली. तरीही कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी आय.टी.आय. शासनाच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत आहे. शिक्षकाच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

अंबडच्या कौशल्य विकास केंद्रात तारतंत्री, वीजतंत्री,  यांत्रिक मोटारगाडी, जोडारी, पत्रकारागीर, वेल्डर, कॉम्प्युटर हार्डवेअर अ‍ॅण्ड नेटवर्किंग मेंटन्स, ड्रेसमेकिंग या आठ ट्रेंडचे 16 युनिटमधून 292 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांच्या विशेष प्रयतनातून झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत ही सुसज्ज आहे. शिवाद संस्थेतील प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व मशनरी उपलब्ध आहेत. मात्र शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सन 2014-15 पर्यंत  येथील पद संख्याही पुरेशी होती. कालांतरणाने येथील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तर काहीच वयानुसार सेवानिवृत्त झाले आहे. या संस्थेत एकूण 32 पदांची मान्यता आहे. 32 पैकी फक्त 11 कर्मचारी शिल्लक राहिले आहे. यात महत्त्वातील 16 निदेशक (शिक्षक) पदांपैकी केवळ 04 निदेशक असून 12 जागा चार वर्षांपासून रिक्त आहे. बाकी शिक्षक हे कंत्राटी पध्दतीने भरले आहेत. त्याना मानधन अत्यंत अल्प शिक्षक मिळणे ही कठीण आहे. 

प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकच नसल्यामुळे मशनरी धूळखात पडल्या आहेत. नवीन ट्रेंड मंजूर असूनही केवळ शिक्षकामुळे सुरू होत नाहीत. येथील वसतिगृह केवळ पाणी पुरवठा नसल्याने सुरू होऊ शकले नाही. शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करित आहे.  विशेष म्हणजे येथे पूर्वी प्रशिक्षण घेतलेले 80% विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनाच्या वीज वितरण कंपनी, एस.टी. महामंडळात व विविध  एम.आय. डी. सी.मध्ये  चांगल्या पदावर नोकरीत आहेत.