Mon, May 20, 2019 18:06होमपेज › Jalna › भाजपला धडा शिकविण्यासाठी मैदानात उतरणार : खोतकर

भाजपला धडा शिकविण्यासाठी मैदानात उतरणार : खोतकर

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 30 2018 12:05AMटेंभूर्णी : प्रतिनिधी

शिवसेनेच्या भरवशावर मोठे झालेले आणि आता शिवसेना संपवण्याची भाषा करणार्‍यांना लोकसभेत धडा शिकवण्यासाठी आपण मैदानात उतरण्यास तयार असल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.

टेंभूर्णी येथील हनुमान मंदिरात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बजरंग बोरसे, रमेश गव्हाड, शहराध्यक्ष गजानन मुळे, दिनकर उखर्डे यांची उपस्थिती होती. खोतकर यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता भाजप नेतृत्वावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत, कारण शिवसेनेच्या भरवशावर मोठे झालेले आता शिवसेना संपवण्याची भाषा करीत आहेत. त्यांना आगामी काळात त्यांची जागा दाखविण्याचे काम शिवसैनिक करतील, असा विश्‍वास व्यक्‍त करीत भविष्यतील राजकीय लढाईसाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले.