Sun, Aug 25, 2019 23:26होमपेज › Jalna › पीककर्जासंदर्भात नायब तहसीलदारांना घेराव

पीककर्जासंदर्भात नायब तहसीलदारांना घेराव

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 1:02AMजालना :  प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यात खरीप पीक कर्ज वाटपासंदर्भात बँका वेळकाढूपणा करत असल्यामुळे व तहसील आणि सहायक निबंधक कार्यालयाकडून प्रचार व प्रसार न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत आहे. या कारणावरून सोमवारी (दि.9)  जय भगवान महासंघाच्या वतीने नायब तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.

पीककर्ज वाटपासंदर्भात बँका वेळकाढूपणा करत असल्यामुळे व तहसील आणि सहायक निबंधक कार्यालयाकडून यासंदर्भात कोणताही प्रचार व प्रसार केला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहात आहेत. शेतकर्‍याना पीककर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे अगदीच पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍याना  सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे, असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे, लालासाहेब शिंदे, शेतकरी सघंटनेचे तालुका अध्यक्ष विश्वभंर भानुसे, कल्याण बीडे, रघुनाथ सोसे, रामनाथ आनंदे, श्रीहरी आनंदे, सुनील धारतरकर यांच्यासह अन्य शेतकर्‍यानी आक्षेप घेत तलाठी ग्रामसेवकांमार्फत गावागावांत सूचना देऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांना  पीककर्ज मिळावे.  यासाठी 16 जुलै रोजी मेळावा घेऊन माहिती द्यावी म्हणून नायब तहसीलदार संदीप मोरे, सहायक निबंधक आर. के . आराख याना लेखी निवेदन देऊन मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी तहसीलदार अश्विनी डमरे यांच्याशी चर्चा करून सहायक निबंधक आराख यांना 16 जुलै रोजी मेळावा आयोजित करून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना या योजनेत  सहभागी करून घेण्याचे आदेश दिले.