होमपेज › Jalna › मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांत विशेष अधिवेशन : अर्जुन खोतकर

मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांत विशेष अधिवेशन : अर्जुन खोतकर

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 1:34AMजालना ः प्रतिनिधी

आंदोलनामुळे शासनावर चोहोबाजूंनी दबाव वाढला असून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल, असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे बोलताना व्यक्त केला.  

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार शुक्रवार, 3 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आठवडी बाजार बंद राहतील, असे निश्चीत करण्यात आले आहे. जालना जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यासमोर बुधवारपासून  बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. गुरुवारी   राज्यमंत्री अर्जुन  खोतकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले  की, मंत्री असतानाही समाजाची भूमिका मंत्रिमंडळ, सभागृहात मांडली. निष्पाप तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे आपण एकमेव मंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हे व अटकसत्र थांबविल्याचा दावाही त्यांनी केला. तरुणांच्या भावना तिव्र असुन उद्रेक सोडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे, लढाई  जिंकेपर्यंत माघार नाही. यासाठी कायदा हातात घेऊ नका असे आवाहनही खोतकर यांनी केले. 

यावेळी समाजबांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घनसावंगीत 36 तर बदनापुरात 2 गुन्हे दाखल झाले असून राजकारण, स्थानिक गटबाजीसाठी निष्पाप तरुणांना अडकवू नका, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठा बांधव उपस्थित होते.