होमपेज › Jalna › मुलींच्या वसतिगृहासाठी निधी देऊन जपली सामाजिक बांधिलकी

मुलींच्या वसतिगृहासाठी निधी देऊन जपली सामाजिक बांधिलकी

Published On: May 12 2018 1:27AM | Last Updated: May 12 2018 12:33AMजालना : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे भीमराव लिंबाजी शिंगाडे व निकिता काळे यांचा शिवविवाह शिवप्रतिमा पूजन व राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर प्रतिमा पूजन करून पार पडला. तसेच वधू -वर यांचा शपथ विधी व शिव मंगलाआष्टके अशा शिवधर्म पद्धतीने हा विवाहसोहळा झाला.

यावेळी  नवदांपत्याने मुलींच्या वसतिगृहासाठी निधी देऊन समाजाप्रती बांधिलकी दाखवून, एक नवा आदर्श ठेवला यावेळी प्रा. सुदर्शन तारख  (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ), ज्ञानेश्‍वर उढाण  (जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ जालना),कारभारी सपाटे (तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ घनसावंगी), योगेश मोरे ( जिल्हा संघटक वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद), योगेश पवार , महादेव शिंदे,आकाश औटे आदींची उपस्थिती होती.