Tue, Jul 16, 2019 00:04होमपेज › Jalna › ज्येष्ठ शिवसैनिकांनी पक्षाचे सारथ्य करावे

ज्येष्ठ शिवसैनिकांनी पक्षाचे सारथ्य करावे

Published On: Feb 04 2018 2:28AM | Last Updated: Feb 04 2018 2:28AMमंठा ः प्रतिनिधी 

शिवसेनेचा जन्म संघर्षातून आणि संघर्षासाठी झालेला आहे.ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपले आयुष्य पक्षासाठी वेचले त्यांनी आता पक्षाचे सारथ्य करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते व्याख्याते तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांनी केले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, पंडित भुतेकर, अंकुशराव आवचार, बाबासाहेब तेलगड, बेबी पावसे, तुळशीराम कोहिरे, हरिभाऊ चव्हाण यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज हे खर्‍या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांनाच समजले होते. म्हणून त्यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्‍कासाठी अठरापगड जातींना एकत्र करून  शिवसेनेची स्थापना केली, असे प्रा. बानगुडे यांनी सांगितले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, ज्येष्ठ शिवसैनिकांनी त्या काळात केलेल्या कष्टांमुळे शिवसेनेला आज वैभवाचे दिवस आले आहेत. या गोष्टीचा शिवसेनेला कधीही विसर पडणार नाही. प्रास्ताविकात ए. जे. बोराडे यांनी शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रांनुसार चालते असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद बोराडे, संतोष वरकड, सचिन बोराडे, संजय नागरे, बालासाहेब बोराडे, वैजनाथ बोराडे, अरुण वाघमारे उपस्थित होते.