Thu, Apr 25, 2019 22:04होमपेज › Jalna › चिंचोलीत आठवडाभरात सात घरफोड्या

चिंचोलीत आठवडाभरात सात घरफोड्या

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 25 2018 12:18AMघनसावंगी : प्रतिनिधी 

तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे आठवडाभरातच सात घरफोडींच्या घटना घडल्या. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे आठ दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. 15 एप्रिल रोजी एका शेतकर्‍याच्या शेतातील आखाड्यावर बैलजोडी, 2 गाय ,2 म्हैस चोरताना आढळून आल्याने शेतकर्‍याने आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले. 16 एप्रिल रोजी भारत तुकाराम बादडे या शेतकर्‍याची बैलजोडी चोरीस गेली. 17 रोजी बैलचोरीचा प्रयत्न झाला होता. 21 रोजी चंदर निवदे यांच्या घरी चोरी झाली. कडूबा निवदे, नायबराव निवदे यांचेही घरी चोरी झाली, तर पांडुरंग पवार यांचे किराणा दुकान फोडले. आप्पा खांडे, दादाभाऊ घोगरे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

Tags : Jalna, Seven, robbery,  Chincholi