Mon, Jun 17, 2019 03:19होमपेज › Jalna › मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Published On: Jan 31 2018 2:04AM | Last Updated: Jan 31 2018 12:31AMजालना : प्रतिनिधी

शासन धोरणाच्या अनास्थेला कंटाळून शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले की, शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूला सरकार व सरकारची शेतकरीविरोधी धोरणेच कारणीभूत आहे. यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना गुन्हेगार समजण्यात यावे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे,  वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे जिल्हाध्यक्ष भीमराव शिंगाडे, तुळशीराम चंद, विजय वाढेकर, जालिंदर मोरे, अरविंद घोगरे, कैलास खांडेभराड, राहुल जर्‍हाड, सचिन चिमणे, रामप्रसाद वाघ, संभाजी गायके, शरद चौधरी, राजू सोनवणे, आकाश गोडसे, नितीन गोडसे सुनील चांदणे, किशोर घोडके आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.