Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Jalna › ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीला प्रतिसाद

ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीला प्रतिसाद

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:15PMमाहोरा : गजानन राऊत 

राज्य शासनाने पर्यावरणाचा विचार करून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. या बंदीला ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत आहे.प्लास्टिकमुळे पर्यावरणात समतोल राहत नाही. प्लास्टिक पिशव्या नष्ट होऊ शकत नसल्याने त्यावर बंदी घ्यालण्यात आली आहे. ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी घरूनच पिशवी सोबत आणत आहेत. आठवडी बाजार तसेच बाजारपेठेत सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांत जनजागृती करण्याची गरज असल्याचे व्यापारी सांगतात. अनेक ग्राहकांनी या बंदीला संमती दिली असून, कॅरिबॅग वापरावर स्वतः प्रतिबंध लावला आहे.

प्लास्टिक बंदी, चांगला निर्णय

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्याचा निर्णय चांगला आहे. प्लास्टिक काही काळ टिकून राहते. प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. आता ग्राहकांनीही प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात.

- दत्ता शेळके, ग्राहक