Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Jalna › पाणीटंचाई आराखड्याचा फार्स

पाणीटंचाई आराखड्याचा फार्स

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत वाढत्या तापमानासोबत पाणीटंचाईचे सावट गडद होत असतानाच दुसरीकडे प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आहे. एप्रिल ते जून  2018 या तीन महिन्यांसाठी 12 कोटी 74 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असला, तरी तहानलेल्या गावांची संख्या  वाढतच आहे. टंचाई आराखड्यातील किती पैसे प्रत्यक्षात खर्च केले जातात हा विषय संशोधनाचा आहे. 

जिल्ह्यात वाढत्या तापमानासोबत पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. भोकरदन व जाफराबाद या दोन तालुक्यांत टंचाईची गावे मोठ्या संख्येने आहे. तुलनेने इतर तालुक्यात टंचाईची दाहकता कमी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान 7 कोटी 65 लक्ष रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी ते मार्चमध्ये त्यात वाढ होउन तो 22 कोटी 48 लाख रुपये करण्यात आला. कागदोपत्री टंचाईच्या आराखड्यात वाढ होत असतानाच तहानलेल्या गावातून टँकर सुरू करण्याची मागणी करणार्‍या ग्रामस्थांचे घसे कोरडे पडल्याचे चित्र आहे. अनेकदा मागणी करूनही गावात टँकर सुरू होत नसल्याने महिला व पुरुषांना दूर-दूर भटकंती करावी लागत आहे. 

मात्र ज्या भागात जलयुक्‍त शिवारची कामे झालेली नाहीत, अशा गावांमधे आजही पूर्वीप्रमाणेच पाणीटंचाई जाणवत आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता 10 कोटी 86 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात 6 कोटी 66 लाखांचा निधी प्राप्‍त झाला होता. टंचाईमधे गावास पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे खोलीकरण, पाइपलाइन दुरुस्ती यासारख्या विषयावर खर्च करण्यासाठी प्रशासन फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे.  


  •