Sun, Jul 21, 2019 01:32होमपेज › Jalna › विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्‍या आरोपीचा जामीन फेटाळला

विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्‍या आरोपीचा जामीन फेटाळला

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 11:13PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर तब्बल पाच ते सहा वर्षे बलात्कार करणार्‍या आणि आत्महत्येस प्रवृत्त करून पीडितेच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या प्रा. राजेश अनंतराव कांबळे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी शुक्रवारी फेटाळला. आरोपी प्राध्यापक पीडितेवर 2012 पासून अत्याचार करीत होता आणि 9 जानेवारी 2018 रोजी पीडितेने आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या 20 पानी ‘सुसाईड नोट’च्या माध्यमातून हा प्रकार उघड झाला.


या प्रकरणी मृत पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्याच्या दोन्ही मुली आजीच्या घरी राहात होत्या. त्यापैकी पीडित मुलगी बी. ए. चे शिक्षण घेत होती. 9 जानेवारी 2018 रोजी सकाळी सहा वाजता पीडित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तरुणीची ‘सुसाईड नोट’ सापडली. या ‘सुसाईड नोट’मध्ये तरुणीने सविस्तर घटनाक्रम लिहिला होता. 

संबंधित तरुणी ज्या महाविद्यालयात शिकत होती, त्या महाविद्यालयात आरोपी राजेश अनंतराव कांबळे (रा. दावरवटी रेसिडेन्सी, सावंगी, ता. जि. औरंगाबाद) हा तिथे प्राध्यापक होता.  आरोपीने त्याच्या पत्नीच्या मदतीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 2012 पासून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये तरुणीने म्हटले होते. 

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पिशोर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला. या प्रकरणात आरोपीची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. 
अर्जाच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील उल्हास
पवार यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला.