होमपेज › Jalna › कुंभार पिंपळगावात अभाविपतर्फे रॅली, २५२ फूट तिरंग्याचे आकर्षण

कुंभार पिंपळगावात अभाविपतर्फे रॅली, २५२ फूट तिरंग्याचे आकर्षण

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:18PMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यातील  कुंभार पिंपळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. भारतीय सैन्यातील जवानांप्रती आदरभाव बाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अभाविपचे महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आकाश आंभोरे व जम्मूचे जवान यांच्या हस्ते  या तिरंगा पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

23 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला.    

71 मीटरचा (252 फूट) तिरंगा पदयात्रेचे आकर्षण होते. भारत मातेचा सजीव देखावाही काढण्यात आला. आकाश अंभोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून यात्रा आयोजनाबद्दलची भूमिका सांगितली. प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक किशोर मोरे यांनी केले. सोनाजी कंटुले यांनी आभार मानले.आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.