Mon, Sep 24, 2018 06:12होमपेज › Jalna › गटविकास अधिकारी राजेश तांगडे निलंबित

गटविकास अधिकारी राजेश तांगडे निलंबित

Published On: Mar 07 2018 2:11AM | Last Updated: Mar 07 2018 2:07AMजालना  : प्रतिनिधी

मग्रारोहयो विहीर घोटाळाप्रकरणी तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल परतूर येथील प्रभारी गट विकास अधिकारी राजेश तांगडे यांच्याविरुद्ध  मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केली. याप्रकरणी दैनिक ‘पुढारी’ने वेळेावेळी वृत्‍त प्रसिध्द केले होते.  प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील शेतकर्‍यांसाठी परतूर तालुक्यासाठी 562 विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले.

 मात्र त्यांनी तब्बल 2 हजार 63 विहिरी मंजूर करून अनियमीतता केली. या प्रकरणी मंगळवारी त्यांच्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांनी निलंबनाची कारवाई केली.
 जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.