होमपेज › Jalna › वादळवार्‍यासह गारांचा पाऊस

वादळवार्‍यासह गारांचा पाऊस

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMविरेगाव : प्रतिनिधी

जालना तालुक्यातील विरेगावसह परिसरात सोमवारी रात्री सायंकाळी वादळीवार्‍यासह गारांचा जोरदार पाऊस पडला. अनेक भागांत गारांचा सडा पडला, तर काही ठिकाणी गावातील झाडे उन्मळून पडली आहेत. सोमवारी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. या पावसामुळे वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. तासभराच्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांसह सामान्य जनतेची तारांबळ उडाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. वीज तारा तुटल्या. 

जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. घनसावंगीत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह, वादळी वार्‍यासोबत, जोरदार अवकाळी पाऊस पडला.  त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या घनसावंगीकरांना काहीसा दिलासा मिळाला. गावातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला. यावेळी अनेक सखल भागात पाणी साचले होते़. दरम्यान काही ठिकाणी लग्नसोहळ्यासाठी खरेदीस आलेल्या मंडळींची गावात खरेदीदरम्यान धांदल उडाली. 

Tags : Jalna, Rain, Thunderstorm