Thu, Nov 22, 2018 01:29होमपेज › Jalna › धनुष्य की पंजा हे अगोदर स्पष्ट करा

धनुष्य की पंजा हे अगोदर स्पष्ट करा

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:57AMजालना : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीसाठी धनुष्याच्या बाणावर गर्जना करणार्‍यांनी धनुष्यावर लढणार की पंजावर हे अगोदर जनतेला स्पष्ट करावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
स्व.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी योग भवन भूमिपूजन सोहळा व प्रभाग क्र.1 व 7 च्या विविध विकास कामांचे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात खा. दानवे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल होत्या. व्यासपीठावर माजी आमदार अरविंदराव चव्हाण, कैलास गोरंटयाल, रामेश्वर भांदरगे, अशोक पांगारकर आदीची उपस्थिती होती. 

दानवे म्हणला की, सध्या लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत.  त्यामुळे ते महाभारताचे दाखले देऊन मनात येईल ते बोलत आहेत. मात्र ज्याच्या पाठीशी श्रीकृष्णही नाही ते धनुष्यबाण काय हाती घेणार. चक्र व्ह्यू भेदण्यासाठी अगोदर धनुष्य बाण हातात घ्यावा लागतो, असे म्हणत राज्यमंत्री खोतकर यांचे नाव न घेता म्हणाले की,  घनसावंगीत एक, जालना येथे दुसरे तर बदनापुरात तिसरे तर सिल्लोडमध्ये चौथे अशा प्रकारे मतदार संघ बदलला की  त्यांची भूमिका बदलते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्येही संभ्रम आहे. अशा परिस्थितीत ते खरोखरच धनुष्य घेतात की पंजा, हा प्रश्न असून आगामी निवडणुकीत त्यांचे कोणते चिन्ह असेल हे जनतेला माहिती आहे, असा प्रश्‍न दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. 

Tags : Jalna, explain, Dhanusdhya,  Hand, beforehand