Sat, Sep 22, 2018 01:36होमपेज › Jalna › वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMजाफराबाद/ पिंपळगाव रेणुकाई ः प्रतिनिधी

वेगवेगळ्या दुचाकी अपघातात जाफराबाद  व भोकरदन तालुक्यात दोन जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली.  जाफराबाद तालुक्यातील भोरखेडा ते माहोरा रस्त्यावर रविवारी (दि.18) सायंकाळी ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत पती ठार झाला. तर पत्नी जखमी झाली. मधुकर कचरू भांबळे (50) असे मृताचे नाव आहे. तर कमलबाई भांबळे असे जखमीचे नाव आहे.

देऊळझरी येथील मधुकर भांबळे पत्नी कमलबाई भांबळे यांना दुचाकीवरून भोरखेडा शिवारात त्यांच्या दुचाकीला टॅ्रक्टरने धडक दिली. यात मधुकर जागीच ठार झाले. तर कमलबाई गंभीर जखमी झाल्या. भाऊसाहेब भांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या अपघातात पिंपळगाव रेणुकाई येथील अंकुश पांडुरंग मुडकुळे (26) याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मुडकुळे रेलगाव शिवारातील शेतात दुचाकीवर भावासोबत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. त्यांचा भाऊ किरकोळ जखमी झाला. पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.