Sun, Jun 16, 2019 12:48
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › आम आदमी पार्टीतर्फे परतूर शहरात गाजर वाटप

आम आदमी पार्टीतर्फे परतूर शहरात गाजर वाटप

Published On: Feb 19 2018 1:51AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMपरतूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या आणि भाजप सरकारच्या फसव्या घोषणांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने परतूर येथे शनिवारी गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सत्तेत येताना भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव देऊ, आत्महत्या थांबवू , हमीभाव देऊ, यांसह अनेक घोषणा केल्या. मात्र भाजप सरकार परतूर मंठा मतदारसंघात शेतकर्‍यांच्या जमिनी बळजबरीने दिंडी मार्गासाठी घेतल्या जात आहेत. शेगाव ते पंढरपूर या निर्माणाधिन दिंडी मार्गासाठी ज्या शेतकर्‍यांच्या  जमिनी गेल्या त्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मावेजा द्यावा.

त्यांच्या परिवारातील एका पाल्याला शासकीय सेवेत घ्यावे. जळालेल्या डिपी तातडीने दुरुस्त कराव्यात, अवैध वाळू उपसा थांबवावा. पालकमंत्र्यांच्या घरासमोर सुलभ शौचालय बांधावे, मंदिर, मशीद, इनामी जमिनी परस्पर विक्री करणार्‍यांवर फौजदारी दाखल करावी,   शहरात सुरू असलेल्या अंतर्गत गटार योजना, सिमेंट रोड निर्माण या कामांची माहिती दर्शवणारे फलक लावावेत. यासह गारपीटग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे विधानसभा निरीक्षक  कैलास फुलारी यांनी केले. यावेळी पुंजाराम सुरुंग, फैजल कुरेशी, काकासाहेब भालेराव, हनुमान हरकळ, गणेश म्हस्के, महादेव काकडे, ओसामा कुरेशी, शेख मुज्जू, साद चौस,इलियास कुरेशी,साईनाथ इंगळे, विजय अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.