होमपेज › Jalna › घाणेवाडीत फक्‍त साडेआठ फूट जलसाठा

घाणेवाडीत फक्‍त साडेआठ फूट जलसाठा

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:17PMजालना : गजेंद्र देशमुख

शहरातील नवीन जालना भागास पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयात साडेआठ फूट पाणीसाठा आहे. अठरा फूट साठवण क्षमता असलेला तलावात अद्यापही दहा फूट पाणी साठ्याची गरज आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत जालना तालुक्यात पावसाचा जोर कमी असल्याने साठा वाढलेला नाही. सध्या 4 दलघमी साठा आहे

निजामकालीन हा तलाव असून, विजेचा वापर न करता  येथून जालना शहराला गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर पाणी येते. नवीन जालना भागातील सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला  या तलावातून पाणीपुरवठा होतो. जुलै अखेरही तलावात साठा कमी आहे. सुमारे अठरा फूट एवढी क्षमता आहे. 20 जुलैअखेर साडेआठ फूट पाणी आहे. पाऊस पडत असला तरी किरकोळ वाढ  होत आहे. पावसाळ्यात सुमारे अर्धा फूट वाढ झाली. मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. आज रोजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पाऊस न झाल्यास समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

खोलीकरणामुळे झाला फायदा : घाणेवाडी जलसंरक्षण मंच तसेच सेवाभावी संस्थांच्या वतीने दर उन्हाळ्यात खोलीकरण करण्यात येते. खोलीकरणामुळे पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत आहे. हजारो ब्रास गाळ जलाशयातून काढण्यात आला आहे.

10 दलघमी क्षमता 

घाणेवाडी जलाशयाची एकूण क्षमता 10 दलघमी आहे. आज रोजी 4 दलघमी आहे. हे पाणी अजून चार ते पाच महिने पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. असे असले तरी मोठ्या पावसाची गरज असल्याचे पाणीपुरवठा अभियंता दासवाड यांनी सांगितले.