Fri, Jul 19, 2019 14:26होमपेज › Jalna › जिल्ह्यात केवळ सतरा टक्के पीक कर्जाचे वाटप 

जिल्ह्यात केवळ सतरा टक्के पीक कर्जाचे वाटप 

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:21AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असून बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याची गती वाढवावी, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बँक अधिकार्‍यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (28) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक एन.व्ही आघाव, अग्रणी बँक अधिकारी प्रशांत  इलमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी रावते म्हणाले की, बदनापूर तालुक्यात पीककर्ज वाटपाबाबत केलेल्या उपाययोजना इतर तालुक्यातही राबवाव्यात. बँकांनी कर्ज वाटपाच्या कामात गती वाढवावी व अधिकाधिक शेतकर्‍यांना पीककर्जाचे वाटप करावे. यावेळी रावते यांनी पीक कर्जासोबतच बोंडअळी व  गारपीट  तसेच  अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाई बाबतची माहितीही जिल्हाधिकारी व  राष्ट्रीय बँकांच्या शाखाधिकार्‍यांकडून  घेतली. बैठकीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.