Fri, Oct 18, 2019 21:33होमपेज › Jalna › जालना : एकाचा कालव्यात बुडून मृत्यू

जालना : एकाचा कालव्यात बुडून मृत्यू

Published On: Sep 22 2019 7:47PM | Last Updated: Sep 22 2019 6:55PM
कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तांड्यावरील शेषराव गांगू राठोड (वय ६०) हे शेतात म्हैस घेऊन कालव्यावर पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी म्हशीने धक्का दिल्याने ते कालव्यात पडले. तेथे कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी त्यांना पाहून आरडाओरड केली. तांड्यावरील लोक तेथे पोहोचेपर्यंत ते बुडाले होते. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह मिळाला.

सायकांळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. या आचानक दु:ख घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.