होमपेज › Jalna › दीड एकरवरील केळी आगीच्या भक्ष्यस्थानी

दीड एकरवरील केळी आगीच्या भक्ष्यस्थानी

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:56PMआष्टी : प्रतिनिधी 

परतूर तालुक्यातील वडारवाडी येथे केळीच्या फडाला आग लागून दीड एकरवरील केळीचा फड संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार, 20 एप्रिल रोजी रात्री घडली. यात शेतकर्‍याचे अंदाजे सात लाखाचे नुकसान झाले.  या विषयी माहिती अशी की, रामराव जानू राठोड यांची वडारवाडी गट क्र. 1 मध्ये शेतजमीन आहे. यात दीड एकर क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड केलेली होती. शुक्रवारी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान अचानक फडास अचानक आग लागल्याने दीड एकरमधील केळीचा फड, ठिबक व तुषार साहित्य जळाले. घटनास्थळी मंडळ अधिकारी बी. के. घुगे, ग्रामसेवक जे. एम. राठोड, कृषी सहायक, तलाठी कृष्णा इंगोले यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही .

Tags : Jalna, One, half, acres,  banana, fire