Sat, Aug 17, 2019 16:32होमपेज › Jalna › पोषण आहाराची चव बदलली...!

पोषण आहाराची चव बदलली...!

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:49PMपरतूर : प्रतिनिधी

तालुक्यातील शालेय पोषण आहाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शिजणार्‍या खिचडीची चव बदलली आहे. अधीक्षक शाळेवर फिरकत नसल्याने विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळत नाही. शालेय शिक्षण विभागाने मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दररोज सकस आहार मिळवा. यासाठी सोमवारी पुलाव, मंगळवारी वरणभात, बुधवारी भातवरण, गुरुवारी पुलाव खिचडी, शुक्रवारी मूग मटकी, चवळी, वटाणा, वरणभात, शनिवारी पांढराभात सोबत वरण तुरीचे किंवा मुगाचे असा वेगवेगळा पोषण आहार दिला जातो. याचप्रमाणे सोमवार ते शनिवार आठवड्यात एक दिवस पूरक आहार देणे आवश्यक आहे. मात्र शाळेकडे पोषण पूरक आहारकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना खिचडी व मटकी वरणभात नियमित बनवत असल्याने विद्यार्थ्यांना सकस आहारमध्ये बिस्किट, अंडे, केळी मिळत नाहीत. 

शिक्षण विभागाचा पोषण आहाराचा सावळा गोंधळ चालला आहे. शासनाने या शालेय पोषण आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय पोषण आहार अधीक्षकांची नेमणूक केली. मात्र, परतूर येथील पद रिक्‍त असल्याने शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा लोंढे यांच्याकडे पदभार आहे. मात्र गेल्या महिन्यापासून त्या पोषण आहारकडे फिरकल्याच नाहीत. मुलांना आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहाराबाबतीत गटशिक्षण अधिकारी अशोक पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मुलांना पूरक पोषण आहाराचे स्पेशल प्रयोजन नाही. आठवड्यात इंधन आणि भाजीपाला खर्चातून देणे अपेक्षित असते. मुख्याध्यापकाने पूरक आहार देणे अपेक्षित आहे.

Tags : Jalna, Nutrition, diet, taste, changed