Sun, Aug 25, 2019 08:20होमपेज › Jalna › परतूरमध्ये चित्रपटाचा पडदा ‘काळाच्या पडद्याआड’!

परतूरमध्ये चित्रपटाचा पडदा ‘काळाच्या पडद्याआड’!

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:31PMपरतूर : केदार शर्मा

चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद काही औरच असतो... मात्र या आनंदाला रसिकप्रेक्षकांना आता मुकावे लागत आहे. कारण शहरात एकही चित्रपटगृह नसल्याने सिनेरसिकांचा हिरमोड होत आहे. शहरात कधी काळी सुररू असलेले  दोन्ही चित्रपटगृहे बंद झाल्याने चित्रपटाचा मोठा पडदा काळाच्या पडद्याआड गेला आहे. रसिकप्रेक्षकांना मात्र टी. व्ही. च्या छोट्या पडद्यावरच समाधान मानावे लागत आहे.

शहरात पूर्वी दोन टुरिंग चित्रपटगृहे होती. गाव भागात भारत टुरिंग तर मोंढा भागात इकबाल चित्रपटगृह होते. सिनेरसिकांना नवे-जुने चित्रपट हमखास पाहायला मिळायचे. शहरासह आजूबाजूच्या गावांमधील रसिक मंडळी खास बैलगाडीत बसून चित्रपट पाहायला यायची. तेव्हा तिकिटाचे दरही जास्त नव्हते. जमिनीवर बसून चित्रपट पाहणार्‍यांसाठी एक रुपया, बेंचवर बसण्यासाठी दीड रुपया तर लाकडी खुर्चीवजा बेंचवर बसण्यासाठी दोन रुपये असे दर होते.