Tue, Feb 19, 2019 14:13होमपेज › Jalna › बोंडअळीला रोखण्यासाठी नवीन फंडा !

बोंडअळीला रोखण्यासाठी नवीन फंडा !

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMघनसावंगी : अविनाश घोगरे
कपाशीवर पडणार्‍या बोंडअळीमुळे शेतकरी चिंतित आहे. मात्र आता यावर नामी शक्कल शोधून काढण्यात आली. उच्च क्षमतेचे हॅलोजन शेतात लावून बोंडअळीचे पतंग नाहिसे करण्याचा फंडा सध्या सुरू आहे. कमी खर्च व वापरास सोपा असलेला उपाय यशस्वी झाला तर शेतकर्‍यांची मोठ्या संकटातून सुटका होणार आहे.

हॅलोजन शेतातील एका खांबावर लावावा लागतो. रात्री आठनंतर एक ते दोन तास हॅलोजन लावल्याने याकडे कीडे आकर्षित होऊन ते फोकसला चिकटून मरतात.

तालुक्यात कपाशीची लागवड जूनच्या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात केली जाते. जून महिन्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर सद्य:स्थितीमध्ये रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.  

पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असणार्‍या कपाशीवर बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात फरदडमुळे अनेक शेतकर्‍यांनी बोंडअळीग्रस्त कपाशीही शेतात ठेवली होती. मागील हंगामामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासूनच झाला होता.