Tue, Sep 25, 2018 06:40होमपेज › Jalna › पाणी वापरासाठी काटेकोर नियम करणे गरजेचे

पाणी वापरासाठी काटेकोर नियम करणे गरजेचे

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:22PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून शाश्‍वत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत असला तरी पाणी वापरासंबंधात काही नियम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सदस्य  चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, पुणे येथील भूजल सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक आय.आय शहा, औरंगाबाद येथील उपसंचालक पी.एल. साळवे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री मेश्राम, कनिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड, उप अभियंता श्री सगदेव आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे.  मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करून अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही लोणीकर यावेळी म्हणाले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.