Wed, Apr 24, 2019 21:35होमपेज › Jalna › उच्च शिक्षणाला लोकचळवळीची गरज 

उच्च शिक्षणाला लोकचळवळीची गरज 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना ः प्रतिनिधी

उच्च शिक्षणासाठी शासनाच्या शैक्षणिक धोरणावर अवलंबून राहता कामा नये. तसेच बदल घडविण्यासाठी उच्च शिक्षणसाठी लोक चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

पद्मभूषण डॉ. बद्रिनारायण बारवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराजा अग्रसेन फाउंडेशन येथे उच्च शिक्षणावर आधारित चर्चासत्रात डॉ. काकोडकर बोलत होते. उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे होते. प्रमुख पाहुणे राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची उपस्थिती होती. 

डॉ. काकोडकर म्हणाले की,  आज प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाची मोलाची भूमिका आहे. उच्च शिक्षणासाठी सरकारवर अवलंबून राहणे योग्य नाही, ती सर्वांची जबाबदारी आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त संशोधन शिक्षण क्षेत्रात झाले आहे. संशोधनामुळे शिक्षण गुणवत्तापूर्ण निर्माण करण्यासाठी निर्णय चांगले घेतले जातात; परंतु शिक्षण व्यवस्थेत निर्णयाची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, देशभरात प्राथमिक शिक्षण जवळपास 26 कोटी तर साडेतीन कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे. प्राथमिकसाठी 85 लाख शिक्षक तर उच्च शिक्षणासाठी 15 लाख प्राध्यापक अध्यापनाचे कार्य करतात. एकंदरित भारताची शिक्षण व्यवस्था ही उत्तम आहे; परंतु यासाठी गुणवत्तापूर्ण पात्र असलेल्यांची संख्या फक्‍त 40 टक्के आहे. चांगल्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुले शहराकडे येत आहे. 

उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, उच्च शिक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात योग्य नेतृत्व निर्माण होते. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण क्षेत्रासंबंधी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार राजेश टोपे यांचेही भाषण झाले.


  •