Fri, Apr 26, 2019 04:06होमपेज › Jalna › राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पंचापर्यंत भरारी

परतूरच्या गोविंद शर्माची राष्ट्रीय स्तरावर मोहर

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:02AMपरतूर : केदार शर्मा

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला गोविंद मदनलाल शर्मा हा आज क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर चमकत असून शालेय जीवनात क्रिकेटपासून  ते  थेट खो-खोमध्ये  आपल्या राज्याचे व देशाचे  नाव  मोठे केले आहे

निवृत्त  तहसीलदार स्व.  मदनलाल शर्मा यांचे चिरंजीव असलेले गोविंद शर्मा यांचा जन्म परतूरचा. लहानपणी परतूर येथे सवंगड्यांसोबत खेळताना, त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण परभणी येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे घेतले. शाळेत इयत्ता दहावीत असताना सन 1989 मध्ये सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. यानंतर क्रिकेटमध्ये त्याने राष्ट्रीय स्पर्धा पश्चिम विभागीय स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेचे मैदान गाजवले.  क्रिकेट खेळताना खोखो विषयी आवड असलेल्या गोविंद नंतर शालेय स्पर्धेत खो-खो चे मैदान गाजवले त्याचा खेळ पाहता त्याची जिल्हा संघात निवड झाली जिल्ह्याचे नेतृत्व करताना आठ राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले, मणिपूर, आसम, बंगाल, दिल्ली या संघाना गारद करून राज्याचे नाव उंचावले शिवाय खेळाचा दर्जा उंचावत गेल्याने त्याने अनेक किशोरवयीन मुले व मुला-मुलींना खो-खो चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली 

शर्मा यांची पहिल्यांदाच राज्य समितीवर वर्णी

खेळातील रुची पाहता तत्कालीन खो-खो संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद शर्मा यांची अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या महाराष्ट्र स्टेट खो-खो असोसिएशनच्या सहसचिव पदी निवड केली. आठ वर्षे पदाची जबाबदारी सांभाळली आता नुकतीच त्यांची खो-खो असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोविंद शर्मा यांची खो खो खेळाप्रति तळमळ पाहता त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. राज्य संघाकडून खेळताना त्यांच्या अनेक शिष्यांनी पराक्रम गाजवले महाराष्ट्र राज्याचे क्रीडा क्षेत्रात मोठे नाव  गाजवले.

आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड

ठाणे येथे नुकत्याच झालेल्या भारत व नेपाळ संघदरम्यान खो खो मालिका घेण्यात आली होती, या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय समितीने त्यांची पंच व सामना अधिकारी म्हणून निवड केली,  या दरम्यान भारतीय संघाने मालिका जिंकून नेपाळला दणका दिला होता.