होमपेज › Jalna › ‘युवकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित यावे’

‘युवकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित यावे’

Published On: Feb 04 2018 2:29AM | Last Updated: Feb 04 2018 2:29AMघनसावंगी ः प्रतिनिधी

निष्क्रिय व अपयशी सरकारचे उच्चाटन करून बळीराजाचे सरकार आणण्यासाठी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन आमदार राजेश टोपे यांनी केले.

घनसावंगी तालुक्यातील बहिरेगाव-भद्रेगाव-रामगव्हाण खुर्द येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, आरोग्य व शिक्षण सभापती रघुनाथ तौर, पंचायत समिती सभापती मंजूषा कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, राम सावंत, कल्याण सपाटे, विष्णूपंत गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार टोपे म्हणाले की, सरकारला संवेदना, भावना राहिल्या नाहीत, अनेक सरकारी कार्यालये अधिकार्‍यांविना आहेत. लोकांना कार्यालयात अधिकारी भेटत नाहीत, सरकारचे अपयश उघड झाले असून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिला नाही.

यावेळी बहिरेगाव येथे मारोती मंदिर सभामंडप 7 लाख, लोकार्पण व दलित वस्तीत सिमेंट रस्ता 5 लाख, भद्रेगाव येथे लक्ष्मीदेवी मंदिर सभामंडप 7 लाख, लोकार्पण, भद्रेगाव दलित वस्तीत सिमेंट रस्ता-5 लाख, रामगव्हाण येथे दलित वस्तीत सामाजिक सभागृह 7 लाख, रामगव्हाण येथे 14 व्या वित्त आयोगातून आर. ओ. प्लान्ट रक्‍कम 3 लाख आदी कामांचे उद्घाटन, भूूमिपूजन व लोकार्पण करण्यात आली.
यावेळी प्रभाकरराव धाईत, नानाभाऊ उगले, नंदकुमार देशमुख, मधुकर देशमुख, बाबासाहेब कोल्हे, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, भास्कर गाढवे, बन्सीधर शेळके, महेश कोल्हे, सुशील तांगडे, गणेश हेमके, राज देशमुख, बापूराव कथले, बाबासाहेब सोमवारे, गजानन देवडे, शालीकराम पवार, विष्णूकांत शिंदे, विलास दिवटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्या पूजा सपाटे, पंचायत समिती सदस्या कमलबाई हेमके, संजीवनी गाढवे यांनी केले होते.