Wed, Jan 23, 2019 01:10होमपेज › Jalna › मंठा तालुक्यात मुगाचे पीक धोक्यात 

मंठा तालुक्यात मुगाचे पीक धोक्यात 

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 12:10AMमंठा : प्रतिनिधी 
तालुक्यात मुगावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक  धोक्यात आले आहे. सुमारे चार हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा मुगाचा पेरा झालेला आहे. 

सुरुवातील पावसाची दडी आता रोगांचा प्रादुर्भाव यामुळे मुगाचे पीक हाती लागण्याची चिन्हे कमी आहेत. काही मुगाला शेंगा लागल्या असून तोडणीचे काम सुरू आहे. काही भागांत मुगाचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. 

कळवा, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यात मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तूर, मूग व उडीद आदी पिकांकडून शेतकर्‍यांना म्हणावे तसेच उत्पादन निघत नसल्याने खरीप हंगाम कापूस व सोयाबीन पिकावर तग धरून असल्याचे काही शेतकर्‍यांनी सागितले. वाढत्या रोगांमुळे शेतकर्‍यांनी फळ पीक अथवा इतर पीक लागवडी शेतकर्‍यांनी कल वाढविला असल्याचे तालुक्यात चित्र आहे.