Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Jalna › बैलगाडी, म्हशींसह आंदोलन 

बैलगाडी, म्हशींसह आंदोलन 

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMजाफराबाद : प्रतिनीधी

शहरासह तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गुरुवारी तालुक्याचा चक्‍का जाम झाल्याचे दिसून आले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत देऊळगाव राजा, भोकरदन, चिखली मार्गावर बैलगाडी, म्हशी, बैलांसह टायर जाळत सरकाचा निषेध केला.

सर्व शासकीय कार्यालये, बँका, दुकाने, शाळा गुरुवारी बंद होत्या. बंदमध्ये लालदेव फाटा, अकोला देव फाटा, टेंभुर्णी, सावंगी फाटा, नळविहीरा फाटा, जाफराबाद शहरातील शिवाजी महाराज चौक, देऊळगाव उगले फाटा, कुंभारी फाटा, सिपोरा फाटा, गोपी फाटा, सोनखेडा फाटा, वरूड बु, सांजोळ फाटा, भारज, शिंदि, खासगाव, आरतखेडा फाटा, जानेफळ फाटा, माहोरा, आसई फाटा यांसह तालुक्यातील अनेक गावागावांत चक्का जाम आंदोलन  करण्यात आले. 

यावेळी आंदेालकांनी सर्वच रस्त्यावर टायर जाळत, बैलगाडी, म्हशी, बकर्‍यांसह  आंदोलन केले.त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम होता.
आंदोलकांच्या चहा व पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आली होती. तालुक्यातील बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. सिपोरा फाटा, कुंभारी फाटा, देऊळगाव उगले फाटा येथून आंदोलनकर्त्यांनी पायी दिंडी काढत जाफराबाद येथील आदोलनात  साहभाग नोंदवला. यावेळी आलेल्या पावसातही  आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन होते.