Sun, Nov 18, 2018 00:44होमपेज › Jalna › लाँगमार्चच्या समर्थनार्थ माकपचा मोर्चा

लाँगमार्चच्या समर्थनार्थ माकपचा मोर्चा

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 1:41AMजालना : प्रतिनिधी

नाशिक येथून शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लाँगमार्चला पाठिंबा दर्शवण्यासाठी जालन्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार, 12 रोजी  काढलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 6 मार्च रोजी नाशिक येथून शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी पायी लाँगमार्च काढण्यात आला. सरकारने मागण्या मान्य न केल्यास विधानभवनाला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकारने शेतकर्‍यांची विनाअट कर्जमाफी करावी, शेतीमालाला दीडपट भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, वनजमीन शेतकर्‍यांच्या नावे करावी, वनहक्‍क कायद्याची अमंलबजावणी करण्यात यावी, समृध्दी महामार्ग व बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला.  

यावेळी कॉ.अण्णा सावंंत, मधुकर मोकळे, सरिता शर्मा यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात सचिन थोरात, रंगनाथ तांगडे, राहुल छडीदार अनिल मिसाळ, शिवा तोगरवार, वसंत घुले, गौरव चव्हाण यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.