Mon, Jan 21, 2019 18:02होमपेज › Jalna › आव्हान स्वीकारण्यास तयार

आव्हान स्वीकारण्यास तयार

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:10AMराजूर : प्रतिनिधी 

विरोधकांकडून घाणरडे राजकारण  केले जात आहे. आपण लोकशाहीत जीवन जगत आहे. मात्र, काही लोक हुकूमशाही पद्धत अवलंबून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. लोकसभेचे आव्हान देण्यास आपण तयार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे सांगितले.

ते म्हणाले, त्रास देणार्‍यांना शिवसैनिक जशास तसेच उत्तर देईल. लोकसभेचे आव्हान मी स्वीकारण्यास तयार असून, माझ्या नावाच्या चर्चेनेच विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली आहे. कुणी अंगावर येत असेल, तर त्यास रोखण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजूर येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसनेच्या वतीने अंगणवाडीतील 251 बालकांना गणवेश वाटप व लोणगाव येथे शिवसेनेच्या शाखेची स्थापना राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आली.