Sat, Sep 22, 2018 22:33होमपेज › Jalna › ‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान

‘मत्स्योदरी’च्या चरणी साडेतीन लाखांचे दान

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:29AMअंबड : प्रतिनिधी

अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानची दानपेटी गुरुवारी सकाळी उघडण्यात आली. भाविकांनी देवीच्या चरणी सुमारे साडेतीन लाखांचे दान दिल्याचे स्पष्ट झाले. यात रोख 3 लाख 45 हजार  600 रुपयांसह सोन्या, चांदीच्या मौल्यवान वस्तूही भाविकांनी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. दानपेटीतील रक्‍कम व साहित्याची मोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात आली.

यावेळी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, नायब तहसीलदार तथा सचिव संदीप ढाकणे, विश्वस्त बालासाहेब देशमुख, वसंतराव बल्लाळ, मंडळ अधिकारी पी. डी. शिंदे, तलाठी श्रीपाद देशपांडे, नितीन काचेवाड, पी. यू. काटकर, योगेश कुरेवाड, संस्थान कर्मचारी, व्यवस्थापक कैलास  शिंदे, श्रीनिवास कुळकर्णी, नामदेव राठोड, गोविंद काश्यप तसेच मदतीसाठी अंबादास भवर यांनी सहकार्य केले. मागील  दानपेटी  19 फेब्रुवारी रोजी उघडण्यात आली. त्यात रोख रक्कम 2 लाख 28 हजार 905 रुपये प्राप्त झाले होते.