Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › मराठा आरक्षण : दोन दिवसांत १५६० जणांचे मुंडण  

मराठा आरक्षण : दोन दिवसांत १५६० जणांचे मुंडण  

Published On: Jul 29 2018 1:37AM | Last Updated: Jul 29 2018 1:36AMजाफराबाद :  प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. दोन दिवसांत तब्बल 1560 जणांनी मुंडण करीत शासनाचा निषेध केला. 

शहरात शुक्रवार, 28 रोजी हिवराबळी येथे 101, वरुड बु. 71, भारज 107, सावंगीमध्ये 60, अकोलादेव येथे 71, डावरगाव देवी 55, पिंपळखुंटा 54, आंबेगाव 25, बोरगाव 30, देळेगव्हाण 25,  हिवराकाबळी 41  अशा प्रकारे एकूण जाफराबाद शहंरासह अन्य गावांत  एकूण 1560 मुंडण केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अन्य समाजातील बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या संख्येने मुंडण करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच  वेळ असल्याची माहिती जाणकरांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास अशा प्रकारची आंदोलने सुरूच राहणार आहे.