Thu, Apr 25, 2019 04:12होमपेज › Jalna › महावितरणचे व्यवहार होणार ऑनलाइन

महावितरणचे व्यवहार होणार ऑनलाइन

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:31AMजालना : प्रतिनिधी

डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या 1 मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या 1 मेपासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या कामांची बिले धनादेशच्या स्वरूपात देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.

यामुळे या सर्व प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतिमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित सॅप प्रणालीद्वारे केंद्रीकृत देयक अदा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांचे दरमहा सुमारे 20 हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपरिक वीज खरेदीशी संबंधित 5 ते 6 हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे.

याशिवाय महावितरणच्या कर्मचार्‍यांशी संबंधित 75 ते 80 हजार एवढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाइल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.