Tue, Nov 20, 2018 05:26होमपेज › Jalna › ‘इंटरचेंज’ हलविण्यात येऊ नये

‘इंटरचेंज’ हलविण्यात येऊ नये

Published On: Feb 06 2018 1:45AM | Last Updated: Feb 05 2018 10:31PMजालना : प्रतिनिधी  

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंट निश्‍चित केलेल्या जागीच करण्यात यावा, तसेच समृद्धी महामार्गात जाणार्‍या जमिनीस  1950 प्रतिचौरसमीटरचा भाव देण्यात यावा, या मागणीचे निवेदन जामवाडी व गुंडेवाडी येथील शेतकर्‍यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना दिले.

निवेदनात म्हटले की,  शहरालगत असलेल्या गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात वर्षभरापूर्वी इंटरचेंज पॉइंट निश्‍चित करण्यात आलेला आहे. त्यासंबंधी जाहीर प्रगटन एक वर्षापूर्वी निघाले आहे. संबंधित जमिनीवर वर्षापूर्वी आरक्षणसुध्दा टाकले आहे. इंटरचेंज पॉइंटमुळे शहरातील समृध्दी महामार्गामध्ये प्रवेश व बाहेर निघण्याचा मार्ग असल्यामुळे सदर परिसरात वसाहत, हॉटेल व पेट्रोल पंप होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन खादगाव परिसरात शंभर एकरांपेक्षा अधिक शेती असलेल्या एका उद्योजक लॉबीने सदर इंटरचेंज खादगाव, नागेवाडी शिवारात हलविण्याचे प्रयत्न चालू केले आहे. त्या संदर्भात त्यांनी मुंबई येथील रस्ते विकास महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी अर्थपूर्ण व्यवहार करून सदर परिसरात पुन्हा जमीन खरेदीचा व्यवहार सुरू केला असून, मागील महिन्यात निधोना परिसरात 50 एकर जमिनीची लॉबीनी खरेदी केलेली आहे. त्यामुळे इंटरचेंज हलविण्यात येऊ नये.