Fri, Jul 19, 2019 20:58होमपेज › Jalna › दानवेंकडून शेतकर्‍यांचा वारंवार अपमान

दानवेंकडून शेतकर्‍यांचा वारंवार अपमान

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:08AMभोकरदन : प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे वारंवार शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आणि सन्मानासाठी जालना लोकसभा मतदार संघात आसूड यात्रा काढणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

भोकरदन येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.भोकरदन येथे गुरुवार, दि.17  मे रोजी होणार्‍या शेतकरी आसूड यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कडू यांनी खा. दानवे यांच्या घणाघाती टीका केली.

आ. कडू म्हणाले, दानवेंसारखे आपण दहा दानवे पाडण्याची शेतकर्‍यांची ताकद आहे. शेतकर्‍यांच्या नावावर आणि मतदानावर मोठे झालेले दानवे शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. येणार्‍या काळात त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देतील. पंचवीस वर्षांत ताकदीने व वैचारिक काम करतो कोणत्याही जातीच्या- धमार्र्ंच्या संघटनेत काम करत नाही.शेतकर्‍यांच्या संघटनेत काम करत आहोत. कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर मी निवडणूक लढलो नाही. तीन वेळा अपक्ष राहिलो.

मला सहज कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असते,  पण राजकारण माझ्या डोक्यात नाही, असेही ते म्हणाले. दानवे हे दंडुकेशाहीचे राजकारण करत आहे. त्यांनी मतदारसंघात लोकशाही संपवून टाकली आहे. हुकूमशाहा निर्माण करत असाल तर त्यालाही बुडून टाकेल. दाभाडी येथून आसूड यात्रा काढणार आहे. यावेळी ‘प्रहार’चे सुधाकर शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अंकुश जाधव, श्रीमंत राऊत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, तांबडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब वानखेडे, नारायण सहाने, अनिल भुतेकर, नारायण लोखंडे, रामदास पोहरकर आदी उपस्थित होते.