Wed, Jul 17, 2019 12:29होमपेज › Jalna › ‘आसूड यात्रा’ शहरात

‘आसूड यात्रा’ शहरात

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:12AMजालना : प्रतिनिधी

आमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा शनिवार, दि. 26 मे रोजी शहरात आली होती. या यात्रेत जवळपास 40 ते 50 वाहनांचा ताफा होता. सकाळी अंबड रोडवरील विश्रामगृहातून यात्रेस सुरुवात झाली. 
आमदार कडू यांनी शहरातील संभाजी उद्यान, गांधी चमन येथील महात्मा गांधी, मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आसूड यात्रेच्या माध्यमातून आपण शेतकर्‍यांचे प्रश्‍न जाणून घेतले असून आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून निवडणूक लढवायची किंवा नाही याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

खा. दानवेंच्या बालेकिल्ल्यात सभा

आमदार बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील विविध गावांना गेल्या काही दिवसांत भेटी दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघातील बालेकिल्ल्यात त्यांनी शुक्रवारी सभा घेतली. यावेळी  प्रदेशाध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन करीत त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कडू यांनी केला. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आमदार बच्चू कडू, जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत.