Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Jalna › बिबट्याची दहशत

बिबट्याची दहशत

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:16AMवडीगोद्री : प्रतिनिधी

परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. धाकलगाव परिसरातील सुभाष रोटे यांच्या शेतात बिबट्याने अडीच वषार्र्ंच्या गोर्‍ह्याचा फडशा पाडला आहे. त्यांचे दुसरे जनावरही बिबट्याने फस्त केले. संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. 

दहा दिवसांपासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला आहे. वडीगोद्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून जनावरे मारण्याचे प्रकार बिबट्याकडून सुरू असतानाच शनिवार, 26 रोजी धाकलगाव येथील शेतकरी सुभाष श्रीरंग रोटे यांच्या शेतात पहाटे 6 वाजता अडीच वर्षीय गोर्‍ह्याच्या गळ्याचा घोट घेत जंगली हिंस्र प्राण्याने गळ्याचा व मागील भाग खाल्ला. वनविभागाने पिंजरा हलवला नसता तर बिबट्या पकडला गेला असता, असे धाकलगाव येथील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी धाकलगाव शिवारातील दोन वासरांचा त्याने फडशा पाडला आहे. वनविभागाने 22 मे रोजी गट नंबर 283 मध्ये पिंजरा लावला होता. तरीही बिबट्याने शुक्रवारी सखाराम ज्ञानदेव काकडे यांच्या गट नंबर 27 मधील शेतातील वासराचा घोट घेतला. शुक्रवारीच(25 मे) धाकलगाव शिवारातील गट नंबर 283 मध्ये लावलेला पिंजरा काढल्यानंतर पिठोरी सिरसगाव शिवारातील गट क्र. 27  मध्ये शोभानगर येथील शेतात लावण्यात आला. त्यांनतर शुक्रवरी रात्री धाकलगाव शिवारातील गट नंबर 283 मधील शेतात असणार्‍या अडीच वषार्र्ंच्या गोर्‍ह्याचाही फडशा पाडला आहे.