Sun, May 26, 2019 21:34होमपेज › Jalna › बिबट्याला सोडले जंगलात

बिबट्याला सोडले जंगलात

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:18PMपिंपळगाव रेणुकाई : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांगवी येथे दोन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या बिबट्यास अखेर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांंनी जंगलात नेऊन सोडले. या बिबट्याची तब्येत ठणठणीत असून बिबट्या या भागात कसा आला याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. अवघडराव सांगवीत शनिवारी बिबट्याने दोन जणांना चावा घेतल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या आडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

रविवारी पकडलेल्या बिबट्याच्या प्रकृतीची तपासणी पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली असता  बिबट्याची तब्येत ठणठणीत आसल्याचे त्यांनी  सांगितले. त्यानंतर बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी  जंगलात नेऊन सोडले. यावेळी वन्यजीव विशेषज्ञ प्रसाद आष्टेकर, वनविभागाचे संतोष दोंडके, राजेश बलाडे, एच. के. घुसिंगे, एस.डी. इटलोड, पी. के. शिंदे, आर.एम. शेख, एस. एन. बुलकुले, दत्ता जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते. मोकळ्या वातावरणात झेप घेत या वेळी बिबट्याने धूम ठोकली.