Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Jalna › मराठी भाषा फाउंडेशन वर्गासाठी जनजागृतीचा अभाव

मराठी भाषा फाउंडेशन वर्गासाठी जनजागृतीचा अभाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : अप्पासाहेब खर्डेकर

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची माहिती व्हावी, तसेच या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत टिकाव धरता यावा. यासाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधीदेखील खर्च केला जात आहे, मात्र या योजनेसंदर्भात जनजागृतीच केली जात नसल्याने ही योजना कागदावरच दिसत आहे. 

पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक (मुस्लिम, बौद्ध, जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन) समाजामधील उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये समान संधी मिळण्याच्या दृष्टीने, तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील काही शाळांत शिकणार्‍या इयत्ता आठवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना 2006 पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये शिक्षकांना मानधन तत्त्वावर नेमणूक दिलेली आहे.

त्यांना दरमहा मानधन देण्यात येते. शिक्षकांनी नियमित शिकवणीव्यतिरिक्त अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा कोचिंग) हे करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नियुक्ती 200 रुपयांप्रमाणे करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या योजनेकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना केल्या जात नसल्याने ही योजना केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही शाळांत मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरू असले तरी या योजनेतून अनेक शाळा कमी झाल्या आहेत. या योजनेसाठी प्रस्ताव कधी आणि कुठे सादर करायचा यासंदर्भात कुठलीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. यामुळे अनेक शाळा या योजनेपासून लांब रहात आहेत. जिल्ह्यात एकूण 16 शाळा असून यासाठी 20 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

पुढील वर्षापासून तीन चाचण्या घेणार

मराठी भाषा फाउंडेशन वर्गासाठी नवीन वर्षापासून तीन चाचण्या घेण्यात येणार आहे. शासनाने सुरू केलेल्या उपक्रमाचा सर्वच विद्याथ्यार्र्ंना लाभ व्हावा, यासाठी मुख्यध्यापकानी त्यांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एक वर्षापासून शिक्षकांचे मानधन रखडले आहे. त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.     -कैलास दांतखीळ, शिक्षणधिकारी, निरंतर


  •