Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Jalna › औद्योगिक वसाहतीत खोतकरांची फटकेबाजी

औद्योगिक वसाहतीत खोतकरांची फटकेबाजी

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AMजालना : प्रतिनिधी

 येथील अतिरिक्‍त औद्योगिक वसाहतीत झालेल्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागली.
 जालन्याच्या राजकारणात  उद्योजकांची महत्त्वाची भूमिका असते. पडद्याआड राहून ही मंडळी प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बजावत असते, उद्योजकांपैकी मोठा वर्ग भाजपच्या बाजूने असल्याने इतर पक्षांचा उद्योजकांवर कायम रोष असतो. उद्योजक ज्या पक्षाच्या मागे उभे राहतात.

त्या पक्षाच्या नेत्यास निवडणूक सर्वच दृष्टीने सोयीची व सोपी असते. काही दिवसांपूर्वी उद्योजकांना  विजेच्या प्रश्‍नावर वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिले भरण्यासंबंधात नोटीस बजावल्या होत्या . या बिलावर पेनल्टीही लावण्यात आली होती. या विरोधात आवाज उठवीत राज्यमंत्री खोतकर यांनी विधानसभेत एक तास चर्चा घडवून आणली होती. त्यांनतर उद्योजकांची वीज बिले व पेनल्टी कमी करण्यात आली होती. याबाबत खोतकर यांनी उद्योजकांसाठी लढाई लढूनही उद्योजकांनी श्रेय मात्र भाजपच्या नेत्याला देत त्यांचा सत्कार केल्याने आपण व्यथित झाल्याची खंतही गुरुवारच्या कार्यक्रमात खोतकरांनी व्यक्‍त केली. 

Tags : Jalna, Khotkar, phatkebaji, industrial, colony