Mon, Aug 19, 2019 05:14होमपेज › Jalna › एका वर्षात ५० क्विंटल साखरेच्या गाठी

एका वर्षात ५० क्विंटल साखरेच्या गाठी

Published On: Mar 06 2018 1:18AM | Last Updated: Mar 06 2018 1:06AMपरतूर : भारत सवने

गुढीपाडवा व होळी म्हटले की, रंगांबरोबरच  बाजारात हमखास गाठी या खाद्यपदार्थाची दुकाने थाटलेली दिसतात. होळीच्या व पाडव्याच्या निमित्ताने या गाठी एकमेकांना भेट दिल्या जातात. शहरात साखरगाठी तयार करण्याचा उद्योग पिढ्यान्पिढ्या म्हणजेच 70 वर्षांपासून काजळे कुटुंबीय चालवत आहे. दरवर्षी पन्नास क्‍विंटलच्या जवळ साखरेच्या गाठी बनवत असल्याची माहिती बाबूराव काजळे यांनी दिली.

गाठी बनवण्याचे काम महाशिवरात्रीपासून चालू होते. ते गुढिपाडव्यापर्यंत सुरू राहते. घरातील आई, पत्नी, मुलगी, दोन मुलेही त्यांना मदत करतात. साखरगाठींचे महत्त्व होळीच्या सणापासून तर गुढीपाडव्यापर्यंत असते. वर्षातून केवळ एक महिनाच हे काम असले तरी मोठी मागणी असल्याने ते वेळेवर पार पडणे आवश्यक असते. 

या साखरगाठींची रेसिपी साधारण वाटत असली तरी यामागे मोठी मेहनत घ्यावी लागते. अनेक वर्षांच्या या गाठीला धार्मिक महत्त्व येत आहे. मात्र असे असले तरी दिवाळीला लाडू, करंज्या आणि संक्रांतीला तिळगूळ याप्रमाणेच होळी पाडव्याला या साखरगाठींचे मोठे महत्त्व असते. बारा महिने घरगुती व्यवसायातून तब्बल जवळपास पंधरा टन चिवडा बनवून विक्री करतात. साखरगाठीला शिवरात्रीपासून ते गुढिपाडव्यापर्यंत महत्त्व आहे.

गाठीला या काळात बाजारात मोठी मागणी आहे. पारंपरिक पद्धतीने गाठी बनवत असल्याने खाण्यासाठी चांगली आहे. परराज्यातून येणारी गाठी ही रेडिमेड मशीनवर बनवत असल्याने रसायनचा वापर केलेला असतो. त्यामुळे शरीरासाठी हानिकारक ठरवू शकते.