Thu, Jan 17, 2019 02:12



होमपेज › Jalna › जालना : प्लॉट व्यावसायिकाची भरदिवसा क्रूर हत्या

जालना : प्लॉट व्यावसायिकाची भरदिवसा क्रूर हत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





जालना : प्रतिनिधी

जालन्यातील प्लॉट व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (वय 36) यांची मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास मोदीखाना भागात असलेल्या निवासस्थानाजवळ क्रूरपणे हत्या करण्यात आली. कटारिया यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देवून, हत्या होईल, अशी भीती व्यक्‍त केली होती.

जालन्यात भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे व्यापारी, व्यावसायिक वर्ग धास्तावला आहे. या हत्येप्रकरणी दोषींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होवू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि व्यापार्‍यांनी घेतल्यामुळे शहरात सायंकाळी तणावाचे वातावरण होते. 

कटारिया हे दुपारी घरी असताना त्यांना मोबाईल करून बाहेर बोलाविण्यात आले. ते बाहेर गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर प्राणघातकहल्‍ला करण्यात आला. कटारिया यांच्या किंकाळ्यांनी कुटुंबिय व शेजारीपाजारी बाहेर आले, तेव्हा ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडले होते. हल्‍लेखोरांनी त्यांना ठार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. कटारिया यांची छाती, पोट, तोंडावर वार असून डावा हातही कापलेला आढळला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.