Mon, Aug 19, 2019 05:52होमपेज › Jalna › जालना नगरपालिकेत 52 पदे रिक्त

जालना नगरपालिकेत 52 पदे रिक्त

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 21 2018 12:34AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

येथील नगरपालिकेत विविध विभाग मिळून 52 पदे रिक्तअसल्याने नागरिकांच्या कामाकाजासोबतच पालिकेतील कामांचाही खेळखंडोबा झाला आहे. विशेष म्हणजे अस्थापनेवरील सवंर्ग कर्मचार्‍यांचीही जवळपास 36 पदे रिक्त आहेत. पालिकेत महत्त्वाचे अशी चार अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. 

जालना पालिका अ दर्जासोबतच आयएसओ मानांकित आहे. पालिकेचा कारभार पारदर्शी तसेच गतिमान होण्यासाठी पुरेशा कर्मचार्‍यांची गरज असते. प्रत्यक्षात पालिकेचा कारभार विविध अडचणी तसेच समस्यांच्या गर्तेत अडकलेला आहे. कोणते कर्मचारी काय काम करतात, हेही काही वेळा लक्षात येत नाही. वर्ग तीन व चारचे कर्मचारी अधिकार्‍यांची कामे करत आहेत. त्यांच्याकडे पदभारही आहे. मनुष्यबळ नसल्याने तसे करावे लागत असल्याची पुस्ती पालिका प्रशासन जोडते. प्रत्यक्षात पालिकेत सर्वच विभागांत अनागोंदी सुरू आहे. दीड महिन्यापूर्वी पालिकेतील चार अधिकार्‍यांच्या  बदल्या झाल्या. 

त्यांच्या जागेवर कोणीच आले नाही. त्यामुळे पुन्हा स्वच्छता विभागाचे प्रमुख माधव जमधडे व त्यांच्या पाठोपाठ रत्नाकर अडसीरे हेसुध्दा हिंगोली येथून पुन्हा आले आहे. पालिकेत  वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, ग्रंथपाल, आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, स्वच्छता निरीक्षक, प्रयोगशाळा सहायक,  मुकादम यांसह आस्थापनेवरील संवर्ग कर्मचारी पदांपैकी कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, मिळकत पर्यवेक्षक, विधी व कामगार पर्यवेक्षक, खरेदी आणि भांडार पर्यवेक्षक, समाजकल्याण माहिती आणि जनसंपर्क पर्यवेक्षक  रिक्त आहेत. नगर अभियंता, नगर अभियंता विद्युत, नगर अभियंता संगणक, नगर पर्यवेक्षक स्थापत्य, पर्यवेक्षक संगणक, स्वच्छता पर्यवेक्षक, लेखापरीक्षक, लेखापाल, सहायक लेखापरीक्षक, अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, नगर रचनाकार, उपनगरचाकार, रचना सहायक अशी पदे रिक्त आहेत.  यात पाच अभियंते, 27 तांत्रिक कर्मचारी आणि 8 स्वच्छता निरीक्षकांची पदे रिक्त आहे.