Mon, Nov 19, 2018 15:23होमपेज › Jalna › जालना जिल्हा परिषद पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देणार

जालना जिल्हा परिषद पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देणार

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:25PMजालना : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या  कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत  केरळच्या आपद्ग्रस्तांसाठी  दीड कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरविण्यात आले.

केरळ येथे झालेल्या आपत्तीमुळे तेथील आपद्ग्रस्तांना मदत करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांना आवाहन केल्याने प्रत्येक पदाधिकार्‍यांचे एक महिन्याचे मानधन व कर्मचार्‍याचा एक दिवसाचा पगार देण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन जिल्हा परिषदेच्या सीईओ नीमा अरोरा यांच्याकडे रोख सुपूर्द केले.