Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Jalna › ‘पधारो म्हारा देश’ कार्यक्रम 

‘पधारो म्हारा देश’ कार्यक्रम 

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMजालना : प्रतिनिधी

जालना महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी प्रसन्न मालू यांचा ‘पधारो म्हारा देश’ या कार्यक्रमाचे  उद्घाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, घनश्याम गोयल,  वीरेंद्र धोका, नरेंद्र मित्तल, ब्रिजमोहन लड्डा, गोविंदप्रसाद मुंदडा, सुभाषचंद्र देविदान आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील  स्थानिक कलावंताना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबद्दल नियोजन समितीचे आभार त्यांनी व्यक्त केले. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत समाज परिवर्तन करणार्‍या व्यक्‍तींचा गौरव या ठिकाणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, जिल्ह्यातील  संस्कृतीचा वारसा समृध्द करण्याचे काम जिल्ह्यातील अनेक नामवंत कवी, कलावंतांनी केले आहे. जालना नगरी उद्योग, शिक्षण नगरीबरोबरच संस्कृतीची नगरी व्हावी यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत.  जिल्ह्याचा विकास गतीने होत असून जिल्ह्यात होत असलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी बाजारपेठ यामुळे निर्माण होणार आहे. तसेच सीडपार्कची उभारणी करण्यात येत असून याचा फायदाही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. रसायन व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  तांत्रिक शिक्षण मिळून भविष्य उज्ज्वल होऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम या विद्यालयाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.